Blog

मंगळागौर खेळ

Reading Time: 2 minutes

Marathi Vishwa would like to thank our members and non-members for the overwhelming participation in the ‘Mangalagauriche Khel’ event.

मंगळागौर हा काळाच्या ओघात टिकलेला एक पारंपरिक सोहळा! मराठी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आणि भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मराठी विश्व, न्यू जर्सीने मंगळागौरीचा जागर आयोजित केला होता. या कार्यक्रमात साधारण दीडशे मैत्रिणींनी उत्साहानी भाग घेतला. नऊवारी साड्या, पारंपरिक पेहराव आणि दागदागिने ल्येवून आलेल्या सख्या मंगळागौरीच्या खेळांमध्ये रंगून गेल्या. 

कार्यक्रमाची सुरुवात अश्विनी बेल्हे आणि तृष्णा ठाकूर यांनी म्हणलेल्या मंगळागौरीच्या आरतीने झाली. ‘रेड कार्पेट’वरून नाचत येण्याने सुरू झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. सुपांच्या ऐवजी ताटल्या किंवा बॉक्सेस ची ‘झाकणं, लाटण्याच्या ऐवजी दांडिया आणि खऱ्या मेंदीच्या ऐवजी मेंदीचे टॅटू यातून नव्या जुन्याचा मेळ जमला. संगीता कानिरे, वैजयंती जोशी, वैशाली शिंदे, नीलाक्षी वरणगावकर, स्वाती कोरडे आणि श्रद्धा रणदिवे यांनी सगळ्यांना मंगळागौरीचे खेळ दाखवले आणि शिकवलेसुद्धा. त्यांच्या बरोबर सिंधुमती वरणगावकर आणि मंगला जोशी व गाणी वाजवण्याची बाजू सांभाळायला आहाना जोशी होत्या. त्यांचे कौतुक करण्यासाठी उद्योगसखी काजल गुळवणी यांनी त्यांच्या  Flavours & Aroma या व्यवसायातर्फे मसाल्यांची पाकिटे भेट स्वरूप दिली. 

उखाणे आणि अनुभव कथनाच्या भागाचे सूत्रसंचालन करायला कांचन जोशी यांना  मयुरी शेवतकरने मदत केली.  तीन सर्वोत्कृष्ट उखाण्यांना उद्योगसखी अर्चना पोळेकरने त्यांच्या  Archi’s Kitchen या केटरिंगच्या व्यवसायाच्या वतीने बक्षिसे पुरस्कृत केली. उखाण्यांच्या बक्षीस निवडीसाठी अर्चना आणि स्नेहल वझे यांनी परीक्षक म्हणून मदत केली. यात जान्हवी पाटील यांना पहिले, अपूर्वा पंडित यांना दुसरे तर वर्षा गाडगीळ यांना तिसरे बक्षीस मिळाले. ‘मेमरी वॉल’ हा आगळा वेगळा उपक्रम होता. त्यात सर्वांचे १६ ते २४ वयांमधले फोटो मागवले होते आणि ते छापून लावले होते. आपल्या मैत्रिणींची जुनी रूपं बघताना मजा आली. 

शेवटी सुग्रास अल्पोपहार आणि ओटी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्य सुकर पार पाडण्यासाठी त्या श्रींची इच्छा (खरंतर ‘सौं’ ची 🙂) महत्वाची तशीच आमच्या स्वयंसेवकांची साथ ही. अश्विनी देशमुख, अश्विनी बेल्हे, वंदना आडवाणी, वंदना नेवरेकर, अनुजा केदार, दिपाली हेर्लेकर, ज्योती कर्वेकर, मयुरी सेवतकर, नीलिमा नेवासेकर, समिधा कळमकर,संगीता अंधारे, विजू जोशी, मीनल फणसगावकर आणि आयत्या वेळी ज्या मैत्रिणी मदतीला आल्या त्या सर्वांचे मनापासून आभार. आयत्या वेळी मदतीला आलेल्या मैत्रिणींची नावं माहिती नाहीत म्हणून किंवा कुणाचं नाव अनावधानाने राहीले असेल तर क्षमस्व!  कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी कार्यकारिणी समिती मधील रूपाली गुणे, प्रिया गोडबोले, शलाका सावंत, कांचन जोशी, वृषाली भावटणकर, अनघा येरंडे, दिप्ती कारखानीस आणि मंदार केळकर यांनी सांभाळली.

पुढच्या वर्षी अशा कार्यक्रमाला पुन्हा भेटूयात मात्र तो पर्यंत अगणित फोटो आणि व्हिडिओ यांच्या आनंद नक्की घ्या.

https://www.facebook.com/share/p/tFA6pFramixvnf51/ – Facebook Photo Link

https://youtu.be/K8ztWTwMy9U?si=2MAMmWMI4zOPmEQz – Part 1

https://youtu.be/LLx5PeY6jtA?si=yiCylrYFTJY1CiwC – Part 2

https://youtu.be/49IdiuM6iI0?si=rurZWp7mmqijbOzw – Part 3

Delicious Puranpoli, Masale Bhat, Kothimbir Wadi, Tea: Mejwaani, Edison, NJ

Marathi Vishwa Committee

Blog

MV Teens

Blog

Ganeshotsav 2024

Shrimant Damodar Pant

Blog

MV Gaav Jatra 2024

Blog

Anandi Bhet

Leave a Reply