Makar Sankrant 2025
नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच संक्रांत, जोरदार व धुमधडाक्यात साजरा झाला हे तर तुम्हाला एव्हाना कळलं असेलच! मॉर्गनविल मंदिराच्या प्रशस्त हॉलमधे संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी तीनशेहून अधिक मंडळी अगदी नटून थटून आली होती आणि २५ जानेवारीची संध्याकाळ एका वेगळ्याच जोशात रंगली.
संस्कृतीचा सोहळा: श्वेता आणि ग्रुप यांनी लोकगीतांवर आधारित पारंपरिक नृत्याने कार्यक्रमाची ठेकेदार सुरुवात झाली.
बोरन्हाणाची गम्मत जम्मत: स्वागतानंतर सगळ्यांना वेध लागले ते बालगोपाळांच्या सामूहिक बोरन्हाणाचे. मराठी विश्र्वनी बोरन्हाणाचे सगळे साहित्य पालकांच्या सोयीसाठी पुरवल होते. लहान मुलांनी सुंदर सुंदर काळया आणि रंगीत वेशात, हलव्याचे दागिने घालून उत्साहाने भाग घेतला. एवढंच नाही तर, मुलांनीही लाह्या, हरभरे, चुरमुरे, गाजरं, हलवा, रेवड्या, इत्यादी मेव्यांनी स्वतःला यथेच्छ न्हाऊ घातलं. सर्व मुलांना मराठी विश्वतर्फे एक छोटेशी मजेशीर भेटवस्तू देण्यात आली.
लख लख चंदेरी: हलव्याच्या दागिन्यांचा रॅम्प वॉक सोहळ्याने कल्पकतेचा नवीन उच्चांक गाठला. एकाहून एक सुबक कलाकृतींनी सर्व उपस्थितांची मने जिंकली. मराठी विश्वच्या सदस्या लीना बागवडे यांनी, त्यांनी तयार केलेल्या हलव्याच्या दागिन्यांनी मराठी विश्व मंडळाच्या काही कार्यकारिणी सदस्यांना सजवून अगदी पारंपारिक पोशाख चढवला. वैदेही चिटणीस यांनी सर्व सहभागी सदस्यांच्या झूमकरून रॅम्प वॉकच्या रंगीत तालीमी करून घेतल्या. विशेष म्हणजे कार्यकारिणी मंडळातल्या काही पुरुषांनी सुद्धा उत्साहाने रॅम्प वॉकमधे धमाल गाण्याच्या तालांवर ताल धरला ज्याला टाळ्यांच्या गडगडाटाने उत्तम प्रतिसाद मिळाला.
उखण्यांची उधळण: लोकाग्रहास्तव उखाण्यांचा रंगतदार कार्यक्रम सुद्धा सगळ्यांना मनापासून आवडला. काही पारंपरिक तर काही मजेशीर तर बऱ्याच जोडप्यांनी एकत्र येऊन उखाण्यांची खरोखरंच मुक्त उधळण केली.
हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय सुरेख आणि पारंपारिकरित्या पार पडला. सुदंर अशा संक्रांतीच्या वाणाने सर्व महिलावर्गाची मने जिंकली. चविष्ठ अशा देवळातल्या सात्विक भोजनाने सगळ्यांचा पोटोबा तृप्त झाला.
आपल्या सभासद स्वयंसेवकांनी, स्टेजची सजावट, फोटो बूथची सजावट, जेवणातले पदार्थ वाढायला केलेली मदत, हळदी कुंकू वाण देण्यासाठी केलेली मदत, स्टेजच्या, आसपास लागणारी मदत, म्युझिक सिस्टीम, रजिस्ट्रेशन व इतर अनेक ठिकाणी मनापासून मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय आणि उत्साहाशिवाय हा कार्यक्रम सफल होणे केवळ अशक्य.
समितीचे अध्यक्ष मंदार केळकर, उपाधक्ष्य प्रिया गोडबोले, खजिनदार कांचन जोशी, सेक्रेटरी दिप्ती कारखानीस, व समिती सदस्य अनिरुद्ध निवर्गी, सलिल पारकर, वृषाली बावठनकर , तृष्णा ठाकूर यांनी कार्यक्रमासाठी मोलाची मदत केली.
कार्यक्रमात काही त्रुटी राहिल्या असतील तर क्षमस्व. पुढील संक्रांतीसाठी बऱ्याच मंडळींनी नवीन विषय सुचवले, त्यांचे मनापासून आभार. ज्यांना काही कारणास्तव येता आले नाही त्यांनी पुढच्या कार्यक्रमाला नक्की यायचा प्रयत्न करावा. आपल्या उपस्थितीमुळे प्रत्येक मराठी विश्वाच्या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढते.
=================================================================
Enjoy the pictures: https://www.facebook.com/share/p/1ADk1STn6z/
Enjoy the Opening Program “Sanskriti Sohala”: https://youtu.be/Y0F4m1Vfvq4
=================================================================