Blog

मराठी विश्व ची गोड गोड मकर संक्रांत

Reading Time: 2 minutes

नमस्कार,

नवीन वर्षाचा आपला पहिला कार्यक्रम एकदम दणक्यात साजरा झाला हे तर तुम्हाला एव्हाना कळलं असेलच. 

नवीन जुन्या सर्व सभासदांनी बालगोपाळांसह उत्साहाने हजेरी लावली होती आणि २७ जानेवारीची संध्याकाळ एका वेगळ्याच जोशात रंगली. मॉर्गनविल मंदिराच्या प्रशस्त हॉलमधे संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी तीनशेहून अधिक मंडळी अगदी नटून थाटून आली होती. ओम नोम जी आद्याच्या भक्तिमय सुरेल स्वागतानंतर सगळ्यांना वेध लागले ते बालगोपाळांच्या सामूहिक बोरन्हाणाचे. सगळ्या पालकांनी संपूर्ण तयारीनिशी आणि उत्साहाने ह्या आपल्या लहान मुलांच्या बोरन्हाणात भाग घेतला. एवढंच नाही तर, मुलांनीही लाह्या, हरभरे, चुरमुरे, गाजरं, हलवा, रेवड्या, इत्यादी मेव्यांनी स्वतःला यथेच्छ न्हाऊ घातलं. 

हलव्याचे दागिने आणि पतंग बनवण्याच्या स्पर्धेने या वर्षी कल्पकतेचा नवीन उच्चांक गाठला. एकाहून एक सुबक कलाकृतींनी सर्व उपस्थितांची मने जिंकली.

‘महाराष्ट्रीय पोशाखांचा गौरव वॉक’ या विभागात जवळ जवळ सर्वच उपस्थितांनी स्टेजवर सहपरिवार येऊन भाग घेतला आणि धमाल गाण्याच्या तालांवर ताल धरला.

हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय सुरेख आणि पारंपारिकरित्या पार पडला. आमच्या समितीतल्या सदस्य रूपाली गुणे यांनी भारतातून ताज्या, स्वादिष्ट आणि चवदार गुळ पोळ्या अगदी वेळेत मागवल्या. सुदंर अशा संक्रांतीच्या वाणाने सर्व महिलावर्गाची मने जिंकली.

चविष्ठ अशा देवळातल्या सात्विक भोजनाने सगळ्यांचा पोटाबा तृप्त झाला. गुळ-पोळी वर तुपाची धार धरल्यामुळे समस्त जनता सुखावली. दीप्ती कारखानीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून, जेवणाचे पदार्थ निवडले आणि देवळातला हॉल निश्चित करण्यास मोलाचा हातभार लावला.

आपल्या सभासद स्वयंसेवकांनी, स्टेजची सजावट, फोटो बूथची सजावट, जेवणातले पदार्थ वाढायला केलेली मदत, हळदी कुंकू वाण देण्यासाठी केलेली मदत, स्टेजच्या आसपास लागणारी मदत ही लक्षणीय होती. त्यांच्या मदतीशिवाय आणि उत्साहाशिवाय हा कार्यक्रम सफल होणे केवळ अशक्य.

विहार देशपांडे यांनी म्युझिक सिस्टीमची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आणि अपर्णा देशपांडे आणि अश्विनी चौथाई यांनी स्पर्धेच्या निर्णयकांचे काम अचूक करून योग्य विजेत्यांची निवड केली.

समितीतील इतर सदस्य, अध्यक्ष अनघा येरंडे, कांचन जोशी, अनिरुद्ध निवर्गी, सचिन अडबे, मंदार केळकर, रूपाली गुणे यांनी कार्यक्रमासाठी मोलाची मदत केली.

विशेष आभार: स्नेहल वझे, तृप्ती चितळे, तृष्णा ठाकूर, वैशाली देसाई, बेला बावधनकर,अपर्णा नानिवडेकर, कांचन पाठक, मनीषा करमरकर, मीना क्षीरसागर, पद्मजा लेले, रोहिणी, श्रद्धा पवार, सोनाली उर्ध्वरेशे, सुषमा गोधा, वैशाली मरकळे, विद्या, विद्या भुजबळ, स्नेहल बने, आणि इतर बरीच मंडळी ज्या मधे बऱ्याच सभासदांच्या परिवाराचे देखील योगदान होते. कुणाची नावे अनावधानाने राहिली असतील आणि कार्यक्रमात काही त्रुटी राहिल्या असतील तर क्षमस्व.

ह्या कार्यक्रमाची आखणी प्रिया गोडबोले आणि वृषाली भावटणकर यांनी केली होती. पुढील संक्रांतीसाठी बऱ्याच मंडळींनी नवीन विषय सुचवले, त्यांचे मनापासून आभार.

ज्यांना काही कारणास्तव येता आले नाही त्यांनी पुढच्या कार्यक्रमाला नक्की यायचा प्रयत्न करावा. 

आपल्या उपस्थितीमुळे प्रत्येक मराठी विश्वाच्या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढते.

Blog

MV Teens

Blog

Ganeshotsav 2024

Shrimant Damodar Pant

Blog

MV Gaav Jatra 2024

Blog

Anandi Bhet

Leave a Reply