Sahitya Kunj & BalKatta 2025
The Marathi Vishwa SahityaKunj event was held on March 8th, 2025 at the First Presbyterian Church in Matawan, NJ. Conceptualized and started in the year 1995, this was the 30th SahityaKunj. Around 35 participants, including children in the youth section known as ‘Baal Katta’, showcased their literary talents in various genres such as fiction, nonfiction, humor, memoir, short stories, and more, in front of an enthusiastic audience of nearly hundred people.
We would like to congratulate all the participants for their exceptional contributions and insightful topic selections, especially the parents, who made efforts to discuss and let the children write about their preferred topic, which was presented flawlessly.
The event was led by board members Priya Godbole and Kanchan Joshi with the help and support of other board members Mandar Kelkar, Dipti Karkhanis, Roopali Gune, Vrushali Bhawtankar, Salil Parkar, trustee Vihar Deshpande and our dedicated volunteers for the day Sonali Bhavthankar and Shailesh Karkhanis.
The delicious batata vada, pinapple sooji halwa and especially hot tea served throughout the event made the program more enjoyable.
We would like to salute SahityaKunj founders, the late Shri. Laxman (Bandu) Phadke, Shri. Mukundrao Satwalekar, and some literature lovers who conducted the first SahityaKunj on June 11th, 1995 at Plainsboro Township Community Center, NJ, and gave us the gift that will be carried forward for many years to come. We would like to thank Shri. Nanda kaka Padte and Mrs. Rajeshree Kulkarni to share and convey this valuable information to us.
Enjoy the event update in Marathi here:
नमस्कार मंडळी,
१९९५ पासून आपल्या न्यू जर्सीतल्या साहित्यिक मंडळींसाठी ‘मराठी विश्व’तर्फे, एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि ते म्हणजे, ‘साहित्यकुंज’. भारताबाहेर राहत असल्यामुळे नवीन मराठी साहित्य वाचण्याची, लिहिण्याची आणि ऐकण्याची उणीव हा कार्यक्रम पुरेपूर भरून काढतो. आपल्यातलेच तासलेले, कुशल लेखक असोत, किंवा उभरते लेखक, रचनाकार मंडळीं असोत, त्यांच्या सर्जनशीलतेमुळे गेली तीस वर्ष हा जिव्हाळ्याचा कार्यक्रम अव्याहतपणे तेवढ्याच नाही तर तसूभर जास्तच उत्साहाने सुरु आहे.
मराठी विश्वतर्फे या वर्षीचे ‘साहित्यकुंज’ मार्च ८, २०२५ला दुपारी २ ते सायंकाळी ५.३० पर्यंत साधारण शंभर श्रोत्यांच्या उपस्थितीत ‘फर्स्ट प्रेस्बिटेरियन चर्च’, माटावान, न्यू जर्सी येथे यशस्वीरीत्या पार पडला. पस्तीस लहान-मोठ्यांच्या सहभागाने नव नवीन कथा कल्पनांचे अनेक पैलू ऐकायला मिळाले.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता, ॐ सहनाववतु, श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, या श्लोकांनी, ओघवणाऱ्या वाणीत दोन विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची निर्मळ सुरुवात केली. पुढच्या कवितेतून सद्गुरुंना साकडे घातले गेले आणि मग विविध विषयांची उधळण सुरु झाली. आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनसुद्धा असल्यामुळे खास महिलांसाठी रचलेल्या कविता आणि लेख, महिलांची प्रबलता, बलिदान, ऊर्जा जशी अनाहत असू शकते तेवढीच तिची मृदुताही तिची शक्ती बनू शकते, हे आणि असे अनेक विषय, आणि विचार प्रेक्षकांना भावून गेले. काही हास्यकथांनी थोड्या फार गंभीर झालेल्या वातावरणात बहार आणली, तर काही प्रवास वर्णनांनी आपल्याला पुढच्या सफरींची दिशा दाखवली. आपल्या लहानपणीचे किस्से, आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे काही भावनिक अनुभव आणि काव्य प्रस्तुती सर्वांना जवळची वाटली, तर निसर्ग वर्णनांनी कार्यक्रमात एक ताजेपणा आणला. अशा आणि वेगवेगळ्या विषयांची उधळण करून सर्व सदारकर्त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
कमालीची गोष्ट म्हणजे, या वर्षी बालकट्ट्यामधे मुलांनी बहारदार सादरीकरण केले. वाढदिवसाचा अनुभव, स्वप्नातली शाळा, आजी आजोबा, भारत भेट, ते आयुर्वेद, आणि पर्यावरणाची समस्या अशा विविध अंगी विषयांवर मुलांनी त्यांना समजेल अशा भाषेत व्यवस्थित सदरीकरण केले. कुठेही न अडखळता, विषयांची आणि विचारांची प्रांजळता स्पष्ट दिसत होती. सर्व मुलांचे आणि पालकांचे अनेक अभिनंदन की ज्यांनी तयारीनिशी आणि मराठी वाचता लिहिता यावे या कळकळीने या कार्यक्रमात आपला आणि मुलांचा सहभाग नोंदवला होता.
आपल्या पुढच्या पिढीने आत्मविश्वासाने मराठी भाषा सर्वार्थाने अंगीकृत करण्याचा हेतू हळू हळू साध्य होताना दिसत असल्यामुळे, मराठी विश्वतर्फे आम्हाला सर्व सहभागींचा अभिमान आणि कौतुक वाटते.
ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे नेतृत्व उपाध्यक्ष, प्रिया गोडबोले व खजिनदार, कांचन जोशी यांनी केले होते.
या तृप्त अनुभवनानंतर चविष्ट शिरा आणि खमंग बटाटेवड्यांनी कार्यक्रमाची मजा आणखीन वाढवली. संपूर्ण कार्यक्रमात वाफाळलेला चहा श्रोत्यांसाठी उपलब्ध होता. सुग्रास पदार्थांचे आयोजन आणि नियोजन दिप्ती कारखानीस, सलील पारकर आणि स्वयंसेवक शैलेश कारखानीस, यांनी केले होते. विहार देशपांडे, अध्यक्ष मंदार केळकर, सलील पारकर यांनी ऑडिओ सिस्टिमची जबाबदारी घेतली होती, तर, माननीय कार्यकारिणी मंडळाच्या सदस्य रूपाली गुणे, वृषाली भावटणकर आणि सलील पारकर यांनी कार्यक्रमाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मराठी विश्व कार्यकारिणी मंडळाचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. सकाळच्या ‘काव्यधारा’ कार्यक्रमासाठी जुंपलेली सर्व मंडळी संध्याकाळपर्यंत तत्पर सेवेसाठी हजर होती. अनेक स्वयंसेवकांचे मनापासून आभार ज्यांनी आपला महत्वाचा वेळ या कार्यक्रमासाठी आनंदाने दिला. सोनाली भावठणकर यांचे विशेष आभार ज्या दोन्ही कार्यक्रमाला, स्वयंसेविका म्हणून हजर होत्या.
अशा रीतीने ११ जुन, १९९५ मधे प्लेन्सबोरो टाऊनशीप कम्युनिटी सेंटरमधे श्री. कै. लक्ष्मण (बंडू) फडके, मुकुंदराव सातवळेकर आणि काही साहित्यिक प्रेमींनी सुरु केलेल्या साहित्यकुंजचे तीसावे वर्ष दणक्यात पार पडले. या सर्वांना मराठी विश्वतर्फे मानवंदना. शिवाय ही अमूल्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल श्री. नंदा काका पडते आणि सौ. राजश्री कुलकर्णी यांचे मनापासून आभार.
Enjoy the SahityaKunj /BalKatta YouTube recording: https://youtu.be/7gESmKLsweQ?si=ad2IQOJVJnvEVxX
Thank you
Marathi Vishwa Committee