MV Club55 Holiday Party 2023!
By Gauri Dighe
डिसेंबर उजाडला कि संध्याकाळी चार नंतर अंधाराचे साम्राज्य पसरू लागते. बाहेर झाडांची पानगळ चालू असते आणि हे सर्व अनुभवत असताना Holiday Party चे वेध सुरु होतात. यावर्षीही सालाबादाप्रमाणे हॉलिडे पार्टीचे आमंत्रण ई-मेल वरून मिळाले. त्यामध्ये नील नाडकर्णीचा गाण्याचा प्रोग्राम हे मुख्य आकर्षण होते. परंतु आधल्या दिवशीच कळले कि medical emergency
मुळे तो हा कार्यक्रम करू शकणार नव्हता. तरीही १० डिसेंबर रोजी एडिसन मधल्या ” धाबा ” restaurant मध्ये १५० पेक्षा अधिक लोकांनी मोठ्या उत्साहाने पार्टीचा आनंद लुटला. प्रोग्राम ११:३० ला सुरु होणार होता परंतु ११ वाजताच बहुतांशी मंडळी हजर झाली. दारावरती कार्यकर्त्यांनी सर्वांचे सुहास्य स्वागत केले. त्याचवेळेस त्यांनी नीलचा कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल प्रत्येकी डॉ १० सर्वांना परत केले.
“धाबा ” चा हॉल सुशोभित केलेल्या टेबल्सनी आणि विविध रंगांचे पोशाख करून आलेल्या पाहुण्यांनी फुलला होता. बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटीमुळे गप्पा गोष्टींना उधाण आले होते. त्यानंतर आयोजकांनी सर्वांचे स्वागत करून पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. आयत्या वेळेस नीलच्या प्रोग्रॅम ऐवजी दुसरा तसा कार्यक्रम करणे अवघड होते. तरीही मवि क्लब ५५ च्या सुज्ञ आयोजकांनी विविध छोट्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे लोकांचा उत्साह अधिकच वाढला. नंतर घोषणा झाली ती बार ओपन झाल्याची. तेथे red wine, white wine, beer, mango lassi, strawberry lassi या यांचा समावेश होता. त्यामुळे पाहुणे मंडळी खुश झाली. बारटेंडर्सनी त्यांची कामगिरी चोख सांभाळली. त्यानंतर appetizers ची टेबल्स सर्वाना खुणावू लागली. आलू टिक्की चाट, mixed पकोडा, चिकन कबाब, अमृतसर फिश अशा चटकदार पदार्थांचा पाहुण्यांनी गप्पा गोष्टी बरोबर भरपूर आस्वाद घेतला. त्यानंतर मनोरंजनाचे छोटे कार्यक्रम सुरु झाले. यात, एका परिच्छेदात दडलेल्या हिंदी सिनेमांची नावे ओळखणे, बिंगो, कविता वाचन, गाणी असे विविध कार्यक्रम होते ते पाहुण्यांच्या पसंतीस पडले. त्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम हसत खेळत पार पडला. एव्हाना पाहुण्यांची लंच ची उत्सुकता वाढू लागली होती आणि टेबला जवळ लांब रांगा सुरु झाल्या होत्या. जेवणाची व्यवस्था “धाबा” सुनील पेंडसे आणि त्यांच्या पत्नी सोनाली पेंडसे यांनी छान सांभाळली होती आणि ते सर्वांची विचारपूस करत होते. जेवणाचा मेनू भरगच्च होता. Palak Corn, kadhai पनीर, तडका दाल, chatpata aloo subzi, kadhai chiken, goat कुर्मा, जीरा rice, सलाड, पापड, pickle, Dessert साठी गाजर हलवा, इमृती आणि अंगुरी रबडी असे लोकप्रिय पदार्थ होते. सर्वांनी भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. जेवणानंतर गप्पांची टेबले अधिकच बोलकी झाली होती. चहा, कॉफी घेऊन आसपासच्या टेबला वरील नवीन पाहुण्याना भेटण्यासाठीही बरेचसे लोक उत्सुक होते.
MV Club55 Crafts Corner ने बरीच वर्षे चालू ठेवलेला स्तुत्य उपक्रम म्हणजे डिसेंबर महिन्यात नर्सिंग होम्स ना विणलेले mufflers, caps आणि शिवलेल्या walker bags यांची देणगी देणे ! यंदाही महिला सदस्यांनी विणलेल्या गोष्टींचे हॉल मध्ये छोटेसे प्रदर्शन भरवले होते.
एव्हाना ३ कधी वाजले ते कळलेच नाही. हळूहळू निरोप घेणे सुरु झाले. लवकरच पुन्हा भेटू हे आश्वासन देऊन मंडळी परतली. एकंदरीत यंदाचा हा कार्यक्रम नंदा पडते, अलका पै , शकुन पानसे, मकरंद देवधर, नीता देवळाणकर आणि MV Club55 चे अन्य सहकारी यांच्या उत्तम संयोजना मुळे यशस्वीरीत्या पार पडला. “धाबा” restaurant चे चविष्ट जेवण सर्वांच्या नक्कीच आठवणीत राहील.
आपणा सर्वांना नवीन वर्ष सुखसमृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो हीच मनःपूर्वक शुभेच्छा !
गौरी दिघे (फोर्ड्स , न्यू जर्सी)